वाडी मंदीर अमळनेर संस्थान मधील नित्य नैमित्तीक पुजा अर्चा व वर्षभराचे इतर उत्सव.
सकाळी ५.०० वाजता काकडा,
सकाळी ५.३० वाजता मंगल आरती,
सकाळी ६ ते ८ वाजता देवांची पुजा, पोषाख, अलंकार परिधान, गंधफुल इ.
सकाळी ८ ते ८.३० वाजता वाळवंटातील समाध्यांची पुजा
सकाळी ९.०० वाजता नित्यआरती.
महाविष्णु व महादेव यांना स्नान अभिषेक
दररोज इतर देवतांचा पोषाख बदलणे, गंधफुल लावणे, मुखप्रक्षालन
रोज दुपारी १२ वाजता महानैवद्य.
सायंकाळी ७.०० वाजता पहिली व ७.१५ दुसरी धुपारती.
सायंकाळी ७.१५ ते ८.१५ वा. धुपारती नंतरचे नित्यनेम अभंग.
रात्री ८.१५ वाजता पंचपदी भजन.

एकादशीला – सर्व देवतांना स्नान व प्रमूख मुर्तीचा अभिषेक दुपारी १२ वाजता एकादशी महात्य’ पुराण वाचनानंतर आरती.
रात्री – आजुबाजुच्या परिसरांतील महारांजाचे प्रवचन किर्तन व हरी जागरण होत असते. या दिवशी शेजारती नसते.
व्दादशी – किर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद वाटप होतो.
वर्षभरांत – रामनवमी हनुमान जयंती जन्माष्टमी हे उत्सव साजरे होतात.
अश्विन शु ॥ १ पासुन कार्तीक शु।। २ (भाऊबीज) पर्यत सर्व प्रमुख देवतांना पंचामृत स्नान (रोज) केले जाते. त्यासाठीचे यजमान ठरलेले आहेत.
‘विजया दसमी’ (दसरा) पालखी सोहळा साजरा होतो.
मार्गशिर्ष शु ॥ ८ ते पौर्णिमा भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा होतो.
मार्गशिर्ष वद्य।। ११ – अमळनेर पंढरपुर पायीवारी त्यानंतर चातुर्मास पंढरपुर वास्तव करून आळंदी मार्गे महाराज पंढरपुर ते अमळनेर पायी वारी करून परत येतात. खार्टेश्वर महादेव मंदीरावर महाराजांच्या स्वागतासाठी हजारो भावीक जमा होतात व मिरवणुकीने महाराज समाधी दर्शनानंतर वाडी मंदीरात येतात. मार्गशिर्ष वद्य ॥ १२ सकाळी सखाराम महाराज समाधीला अभिषेक दुपारी ब्राह्मण भोजन सायंकाळी अंबरिशाचे दर्शन मार्गशिर्ष वद्य ॥ १३ व १४ नेहमीच्या भजना खेरीज अन्य महाराजांचे प्रवचन किर्तन होते. मार्गशिर्ष वद्य ॥ ३० वेळा अमावस्या वाळवंटात काल्याचे भजन व नंतर पुढील फिरस्ती कार्य कामाचे नियोजन केले जाते.







