प.पू. महाराजांचे नित्य कार्यक्रम

महाराजांची वर्षभर फिरस्ती असल्याने फिरस्ती वेळी त्यांच्या सोबत देव असतात कोणत्या दिवशी कोणत्या मितीला कोणाकडे मुक्काम असतो हे परंपरागत चालत आल्याप्रमाणे ठरलेले असते काही अपरिहार्य कारणास्तव ह्यात बदल होतो.

मुक्कामाच्या गावी दररोज सकाळी देवपूजा, श्री विष्णू सहस्त्रनाम, रोज सहस्त्र दल तुळशीपत्र अर्पण त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम पार पडल्यावर गावात पानसुपारी, दुपारचे भोजन, विश्रांती. सायंकाळी देवाची धुपारती, नित्यनेमाचे अभंग, श्री ज्ञानेश्वरी वाचन, रात्री महाराजांचे भजन, त्यानंतर फराळ व विश्रांती असे कार्यक्रम असतात.

पंढरपूर येथील चातुर्मास वास्तव्यातील नित्य कार्यक्रम रोज सकाळी

·         6:00 ते 7: 00 देवपूजा

·         7:00 ते 8: 00 भागवत आठ ते साडेसहा

·         8 :00 ते 8: 30 आरती तीर्थप्रसाद

·         10:00 ते 12:00 महाराजांचे भजन

·         दर एकादशीला दुपारी 1:00 ते रात्री 8:00 पर्यंत भजन

·         द्वादशीला सकाळी 5:00 वा काकड्याचे भजन

·         रोज सकाळी 4 वाजता स्नान करून नगरप्रदक्षिणा

·         नगरप्रदक्षिणेनंतर पोथीवाचन, जप, व वर निर्देशित

·         केल्याप्रमाणे नित्याचे कार्यक्रम

·         दुपारी 5:00 ते 6:00 हरिपाठाचे भजन

·         सायं. 6:00 ते 6:30 ते आरती

·         सायं. 7:00 ते 7:30 ते नित्यनेमाचे भजन

·         सायं. 7:30 ते 8:00 ते ज्ञानेश्वरी वाचन

·         रात्री 8:00 ते 9:00 ते पांडुरंगाचे दर्शन

·         रात्री 9:00 वा शेजारती

·         याप्रमाणे संस्थानची व प.पू. महाराजांची नित्य परंपरा

·         गेल्या 250 वर्षापासून अविरत सुरू आहे.