
संस्थांनमधील वर्षभराच्या अश्या व्यस्त कार्यक्रमातील सातत्य सांभाळून अधून मधून श्री प्रसाद महाराज संस्कृती संवर्धनासाठी काही धार्मिक उत्सवांचे आयोजन करीत असतात. आतापर्यंत ( महाराज गादीवर बसल्यापासून ) पार पडलेले कार्यक्रम नमूद करावयाचे झाले तर.
१. इ. स. १९९१ मध्ये अमळनेर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा केला गेला यांत पारायण करणार्यांना ज्ञानेश्वरीच्या प्रती मोफत पुरवण्यात आल्या.
२. इ.स. १९९७ मध्ये पंढरपूर येथे प्रसिद्ध पखवाज वादक शंकर बापू आपेगावकर यांचा पखवाज वादनाचा तसेच प्रसिद्ध गायिका आशाताई खाडीलकर यांचा नाट्यसंगीत गायनाचा सुमधुर असा कार्यक्रम पार पडला.
३. इ.स. १९९८ मध्ये पंढरपूर येथे दासबोध पारायण झाले.
४. इ.स. १९९९ मध्ये अमळनेर येथे मुंबई आकाशवाणी केंद्राचे गायक श्री चन्द्रशेखर वझे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.
५. इ.स. २००० व २००१ लागोपाठ २ वर्षे वेद महर्षी प्रतिष्ठानचे अधिपति पंडित किशोरजी व्यास यांचे श्रीमद भागवत कथा व श्री रामायण कथा असा सुश्राव्य कार्यक्रम झाला.
६. आपल्या गुरुगादी ‘श्री क्षेत्र मुल्हेर’ येथे प.पू. रघुराज महाराज पंडित यांच्या इच्छेवरून प्रसाद महाराज यांच्या पुढाकाराने अविस्मरणीय असा ‘ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा झाला. श्री अजीत कडकडे यांच्या संगीत गायनाचा कार्यक्रमही झाला. त्याचे वैशिष्ट म्हणजे करविर पिठाधीश शंकराचार्य ‘श्री विद्याशंकर भारती’ हे प्रत्यक्ष कार्यक्रमास हजर होते.
७. अमळनेर येथे ‘गाथापारायण’ झाले त्यावेळी श्री अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला.
८. इ.स. २००७ मध्ये अमळनेरला संत सखाराम महाराज चरित्र पारायण सोहळा पार पाडण्यात आला.
९. इ.स. २००८ मध्ये मुल्हेर येथे ७ दिवसाचा गाथा पारायण सोहळा पार पाडण्यात आला.
१०. इ.स. २००९ मध्ये मुल्हेर येथे विष्णुयाग करण्यात आला.
११. अमळनेर येथे विश्वशांतीसाठी व जनकल्याणार्थ ‘पंचकुंडी’ यज्ञ संपन्न करण्यात आली.
१२. याचप्रमाणे इ.स. २०१० ते २०१७ पर्यंत पंढरपूर, पैठण, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशीक, पुणे इ.ठिकाणी, गाथा पारायण, दासबोध पारायण, विष्णुयाग, इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन फार मोठ्या प्रमाणात संस्कृती सवर्धन करण्याचे काम महाराजांनी केले.

१३. इ.स. २०१८-२०१९ मध्ये जनकल्यानार्थ महाराजांनी अमळनेर येथे. सखाराम महाजांचे समाधी सोहळ्याचे द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून १०८ कुंडी. महाविष्णूयागाचे भव्यदिव्य आयोजन केले. ज्या सोहळ्यामुळे न भुतो न भविष्यती असा आनंद सोहळा संपन्न झाला.







