पंढरपूर नित्य कार्यक्रम

पंढरपुरातील चातुर्मासातील नित्य कार्यकम ( पंढरपूर येथील चार महिन्याच्या वास्तव्यात )

आषाढ वद्य॥ ५ पासुन ते कार्तीक शु॥ १० पर्यंत रोज सकाळी ९ ते दुपारी २ व एकादशीला सकाळी १० ते रात्री ८ असा भजनाचा कार्यकम असतो

सोबत रोज भागवत पुराण महिना वार तीथी प्रमाणे भजन नित्यनेम पुजा

सकाळी ४ वाजता नगर प्रदक्षिणा त्यात निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संता सह पुंडलीकाचे समाधी दर्शन व रोज रात्री ८ वाजता पांडुरंगाचे दर्शन हे नित्य कार्यकम परंपरागत आजही सुरू आहे.

चातुर्मासांत निवास करणारे भक्तगण, सेवेकरी, दिंडीतील वारकरी, ब्राम्हण वर्ग

अशा एकत्रीत रोज २५० ते ३०० लोकांचे अन्नदान चारही महिने सुरू असते.

गुरूपौर्णिमा, जन्माष्टमी, श्री तुकाराम महाराज, श्री बाळकृष्ण महाराज, (आंधळे) श्री वासुदेव महाराज, श्री पुरूषोत्तम महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज या गादीपुरूषांच्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात दिपवाळीत दिपोत्सव होतो.