अमळनेर वाडी मंदिर प्रवास
बोरी नदीच्या पूर्व तिरावर वसलेले पैलाड व पश्चिम तिरावर असलेले अमळनेर. (अमल- म्हणजे मल नसलेले) पश्चिमेकडील भागातून बोरी नदी पात्रात दक्षिणेकडे उतरल्यानंतर दिसून येणार्या चार सत पुरुषाच्या समाध्या व उतरेकडे नजर टाकली तर दिसणारा दगडी पूल, त्याच्या पलीकडे भुसावळ सुरत मार्गाचा रेल्वेपूल हे सर्व पाहिले की क्षणभर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात उभे असल्याचा भास होतो. कारण तेथे ही अगदी अशीच परिस्थिती पाहावयास मिळते. म्हणून लोक याला ‘प्रतिपंढरपूर‘ असे म्हणतात. अमळनेरला येण्यासाठी धुळे मार्गे व जळगाव मार्गे असे दोन मार्ग आहेत.