शैक्षणिक उपक्रम
१. लहान मुलामुलींसाठी बालवाडी चालवली जाते. यात 25 – 30 बालकांची उपस्थिती असते. बालवाडीत मुलांना स्वत:ची शरीर स्वच्छता, आपआपसातील प्रेम भाव, नात्यांची ओळख, अक्षर ओळख, बालगीते, शुभम करोती, मनाचे श्लोक, राम रक्षा इ. विषयी शिक्षण देऊन संस्कारित केले जाते.
२. इ.स. २००६ पासून ‘वेद पाठशाळा’ चालविली जाते ज्यात ब्राम्हण समाजाच्या गरजू मुलांना याज्ञिकी, संहिता व ज्योतिष शास्त्र याचे शिक्षण देऊन पारंगत केले जाते एकूण 6 वर्षाचा हा अभ्यासक्रम असून मुले स्वता: च्या चरितार्थासाठी सक्षम होत आहेत. यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था संस्थांनामार्फत मोफत केली जाते.


३. अश्याच प्रकारे २००९ पासून ‘वारकरी पाठशाळा’ देखील चालविली जाते यांत सहभागी विद्यार्थ्यांना मृदुंग वादन, गायन, भजन, कीर्तन, श्रीमद भगवत गीता सहिता , ज्ञानेश्वरी वाचन, विचार सागर, पंचदशी हरिपाठ, प्रवचन, अभंग, गायन, मराठी व संकृत व्याकरण इत्यादि विषय शिकविले जातात. या पाठशाळेत ही 30 ते 35 विद्यार्थी शिक्षण घेतात. यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था संस्थांनामार्फत मोफत केली जाते.दोन्ही पाठशाळेसाठी स्वतंत्र शिक्षक असून सर्वांची वास्तव्य, भोजन, कपडे, व प्राथमिक आरोग्य या सर्वांची काळजी संस्थान घेते.
४. १ व २ वर्षा आड मुलामुलींच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसे वाटप केली जातात. त्यामध्ये वकृत्व निबंध लेखण सामान्य ज्ञान, चित्रकला, रांगोळी इ. स्पर्धांचा समावेश असतो.
५. प्रतिवर्ष इ. १० वी पासून पदवी पर्यंत शिक्षण घेणार्या. विद्यार्थी / विद्यार्थिंनिंचा ( विशेष प्रावीण्य मिळवलेले ) बक्षीस देऊन गौरव करण्यात येतो.
६. पंढरपूर येथे एक शैक्षणिक संस्था सुद्धा चालवली जाते ज्यात त्यांना इ. ५वी ते १० पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
७. मधून-मधून मुलामुलींच्या वेगवेगळ्या, क्रीडा स्पर्धांचे आयोजन ही केले जाते. ( खो-खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, रंगभरण, चित्रकला इ.
सामाजिक उपक्रम
दरवर्षी अमळनेर पंढरपूर अशी पायी वारी जात असते, ज्येष्ठ वद्य|| 1 ते आषाढ शु|| 09 असा 24 दिवसांचा प्रवास असतो. दिंडीत सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या संख्येने भाविक जात असतात. त्यांच्या जवळील अंथरून पांघरून इतर सामान ठेवण्यासाठी मोठ्या गाडीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था, वेळोवेळी गरज पडली तर जनरेटरची व्यवस्था, दिंडीत भजन-कीर्तन प्रवचनासाठी ध्वनिक्षेपची व्यवस्था, प्राथमिक आजारांवर उपचारासाठी डॉक्टरसह ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून सर्व वारकऱ्यांची काळजी घेण्याचे कार्य कसोशीने केले जाते.
संस्थान मार्फत अधून-मधून संस्कृती सेवा पुरस्कार वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी प्रदान केला जातो. फिरस्ती निमित्त जेथे जेथे जातात तेथील गावात मंदिर बांधकामास मदत असो, मंदिरातील मूर्तीविषयी मागणी असो मंदिराचा कळस असो, मंदिरासाठी मोठी घंटा मागणी असो या सर्व मागण्या पूर्ण करणे बाबत महाराजांचा कधीही नकार नसतो. यातच त्यांच्या औदार्य आणि समाजाप्रती अतुट बांधिलकीचे दर्शन घडते.
2018 – 2019 द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमात वृक्ष लागवड व संवर्धन हा पर्यावरणाच्या दृष्टीने समतोल साधणारा सामाजिक उपक्रम सुद्धा राबविला गेला प्रतिकात्मक वृक्षलागवडही महाराजांचे हस्ते करण्यात आली व पावसाळ्यात अंबऋषी टेकडी व बोरीनदी पात्राचे दोन्ही काठावर वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करण्याचे निश्चित झाले.
आरोग्य विषयक उपक्रम
गेल्या 15 वर्षापासून संत सखाराम महाराज पुण्यतिथि निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या रोगनिदान शिबिराचे आयोजन केले जाते. उदा. रक्तदान शिबीर, रक्त गट तपासणी, नेत्र तपासणी, सर्व रोग निदान शिबीर
गेल्या 12 वर्षापासून वाडी संस्थानात स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळे धर्मार्थ दवाखाने चालवले जातात. ज्यात प्राथमिक आजारांची तपासणी व आवश्यक औषधे डॉक्टर मार्फत मोफत पुरवली जातात.
याचाच एक भाग म्हणून २१/४/१९ पासून २९/४/१९ पर्यंत संपन्न झालेल्या अद्वितीय अशा सदगुरु सखाराम महाराज द्विशताब्दी समाधी सोहळा कार्यक्रमात २०/४/१९ पासून २८/४/१९ पर्यंत गरजवंत व दुर्बल घटकांतील लोकांना खालील प्रमाणे जीवनावश्यक साहित्याचे वाटप झाले, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया, रक्त दान इ. कार्यक्रमही पार पडले. व त्यालाही उतमोत्तम प्रतिसाद भाविकांकडून मिळाला. सप्ताह काळात वाटप झालेल्या साहित्याचा हा लेखाजोखा.
नेत्र तपासणी शिबीर
दि. २०/४/१९ पासून जवळ जवळ १२०० लोकांनी नेत्रतपासणी करून घेतली पैकी ५०० लोकांना शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने रुग्णालय उपलब्धतेनुसार २१० शस्त्रक्रिया पार पडल्या व २९० यथावकाश करून देण्याचे मान्य झाले. या कामी धुळे, जळगाव, नंदुरबार येथिल रुग्णालयांनी सहकार्य केले.
रक्तदान शिबीर
पूर्ण सप्ताहात २०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदांनासाठी नवजीवन ब्लड बँक, धुळे/ अर्पण ब्लड बँक, धुळे / जीवन श्री ब्लड बँक अमळनेर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव, माधव राव गोळवलकर रक्तपेढी जळगाव, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव , भाऊसाहेब हिरे शासकीय रक्तपेढी धुळे, यांनी मदत केली. डॉ. शशांक जोशी, डॉ. महेश पाटील, डॉ. अहिरराव, डॉ. पिंगळे व अमळनेर शहरातील नामांकित डॉक्टर्स या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
दिव्यांग साहित्य वाटप
उत्सव सप्ताह काळात नोंदणी केलेल्या व आवश्यक
कागदपत्र पूर्तता करून वेळेवर नोंदणी करीत असलेल्या सर्व गरजूंना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. वस्तु मिळाल्यावर प्रत्येकाच्या चेहर्यावर जो आनंद दिसत होता. त्याचे वर्णन शब्दात होणे कठीण. साधारण साहित्य वाटपाचा आढावा.
१) कमोड खुर्ची २०० नग
२) वाकर्स १०० नग
३) स्टँड काठी ५० नग
४) व्हील चेअर्स ५० नग
५) अंधकाठी ४७० नग
६) कुबड्या ५५ नग
७) तीनचाकी सायकल ७५ नग
अश्याप्रकारे एकूण १००० गरजूंना मोफत वस्तु वाटप करून धार्मिक कार्यक्रमात सामाजिक बांधीलकीही संस्थान मार्फत घेण्यात येते. याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना आला. त्यांच्या चेहर्यावरचे भाव बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते, काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्ट जाणवत होते.